IB Recruitment 2024 | तुम्हाला देखील इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करण्याचे इच्छा असेल तर आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता IB ने इंटेलिजन्स ब्युरो (IB Recruitment 2024) पदांसाठी विविध रिक्त जागा काढल्या आहेत. यामध्ये उपसंचालक उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी यांसह इतर अनेक पदांसाठी भरती काढलेली आहे. त्याचप्रमाणे पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेली आहेत. या पदाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील यामध्ये काम करायचे असेल तर तुम्ही आयबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत तुम्हाला हे अर्ज भरावे लागणार आहेत.
रिक्त जागांचा तपशील
इंटेलिजन्स ब्युरोरोद्वारे (IB Recruitment 2024)या भरती मोहिमेमध्ये एकूण 157 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये उपसंचालक, उपसंचालक तांत्रिक, अतिरिक्त उपसंचालक क्रिटो, उपसंचालक उपकेंद्रीय, गुप्तचर अधिकारी एक्सई आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी ही पदे करण्यात येणार आहेत.
मासिक वेतन (IB Recruitment 2024)
आयबी भरतीच्या (IB Recruitment 2024)अधिकृत अधिसूचनेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना लेवल 10 ते लेवल 13 A पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
इतर लाभ आणि भत्ते
- उमेदवारांना मूळ वेतनाच्या 20% विशेष सुरक्षा भत्ता आणि गणवेश भत्ता देखील दिला जाईल.
- जर उमेदवार वस्तीगृहात राहत असेल तर दरवर्षी 27 हजार रुपये प्रति बालक या दराने शिक्षण भत्ता आणि 81 हजार रुपये प्रति बालक वार्षिक वस्तीगृह अनुदान दिले जाईल.
- अवघड ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर नियमित भत्यांनी व्यतिरिक्त जोखीम भत्ता, भेट भत्ता, विशेष कर्तव्य भत्ता इत्यादी देखील दिले जातील.
- कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मुलांना शिष्यवृत्ती दिली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत
अधिकृत अधिसूचनेनुसार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे दिलेल्या तारखे अगोदर हे अर्ज करायचे आहे तरच तुमच्या अर्ज स्वीकारले जाणार आहेत.