हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेत नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग (IBPS) मध्ये तब्बल 6432 पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक मध्ये जागा भरण्यात येईल.
भरली जाणारी पदे-
परिविक्षाधीन अधिकारी
प्रबंधक प्रशिक्षु
कोणत्या बँकेत किती जागांची भरती-
बँक ऑफ इंडिया- 535 पदे
कॅनरा बँक- 2500 पदे
पंजाब नॅशनल बँक- 500 पदे
यूको बँक- 550 पदे
युनियन बँक ऑफ इंडिया – 2094 पदे
पंजाब आणि सिंध बँक- 253 पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख- 2 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 ऑगस्ट 2022
पीओ भरतीची प्राथमिक परीक्षा- ऑक्टोबर 2022
PO भर्ती मुख्य परीक्षा- नोव्हेंबर 2022
मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2023
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो/तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल..
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया अशी असेल –
1. IBPS PO पदासाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर केली जाईल.
2. IBPS PO भर्ती प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. (IBPS) Recruitment 2022)
3. जे उमेदवार प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना पीओ भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
4. ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
5. त्यानंतर जानेवारी/फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली आईल.
आवश्यक कागदपत्रे
• Resume
• दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
• शाळा सोडल्याचा दाखला
• जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
• ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
• पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा APPLY