विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन |काल शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्याने भारत आता १५ गुणांसह प्रथम स्थानी जाऊन बसला आहे. तर १४ गुणांसह ऑट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या न्यूजीलंडसोबत सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. तर २७ वर्षांनी विश्वचषकात सेमी फायनलला पोचलेल्या इंग्लंडसोबत ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार

विश्वचषक सामने आता अंतिम टप्प्यात आले असून या वर्षीचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताने आपला संघ मजबुतीने सामन्यात उतरवून पहिल्या पासूनच विजयी दौड मारली होते. तर भारताचा क्रिकेट मधील हाड वैरी असणाऱ्या पाकिस्तानने देखील आपला संघ मोठ्या ताकदीने मैदानात उतरवला होता. मात्र त्यांना यावेळी सेमी फायनल गाठता आली नाही. न्यूजलंड आणि पाकिस्तान यांच्यात गुणांची बरोबरी झाली. तर न्यूजीलंडने धावसंख्येचा वेगावर सेमी फायनल मध्ये धडक मारली.

भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण ; भाजप प्रदेशाध्यक्ष पद पडले ओस

या वर्षीच्या विश्वचषकात पावसामुळे सामने रद्द होण्याचे प्रमाण अधिक होते. श्रीलंका तर सामने रद्द होण्याचीच शिकार झाल्याने त्या संघाला घराचा रस्ता धरावा लागला. आता विश्वचषकसामन्यात फायनल कोणात रंगणार हे पाहण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

Leave a Comment