ICC Cricket World Cup 2023 | जगभरात मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी लोक आयसीसी वर्ल्ड कपची वाट बघत असतात . यंदाचा आयसीसी वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात आला असून आज 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या २ संघात यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून या स्टेडियम होणारा हा सामना क्रिकेट चाहत्यासाठी रोमहर्षक असेल.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ICC Cricket World Cup 2023 च्या पहिल्या सामन्यासाठी दुपारी 1:30 वाजता नाणेफेक होईल.त्यानंतर दुपारी 2:00 वाजता क्रिकेट मॅचला सुरुवात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप सुरु होण्याआधी आयोजित करण्यात आलेला उदघाटन समारोह रद्द झाल्याने क्रिकेटप्रेमिची निराशा झाली आहे मात्र आजपासून क्रिकेटचा थरार खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार आहे. तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे आपण बघितलं आहे. तसेच तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनही हा सामना अगदी मोफत मध्ये पाहू शकता.
फ्री मध्ये कुठे आणि कसे पाहता येणार मॅच? ICC Cricket World Cup 2023
भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सर्व सामन्याचे थेट प्रसारण केले जाईल. टीव्ही व्यतिरिक्त, ICC क्रिकेट वर्ल्ड 2023 चे लाइव्ह स्ट्रीमिंग लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar मोबाईल अँपवर विनामूल्य (Free) केले जाईल. याचा अर्थ असा की तुमच्याकडे टीव्ही किंवा Disney+ Hotstar चे सदस्यत्व नसले तरीही तुम्ही क्रिकेट विश्वचषक 2023 विनामूल्य तुमच्या मोबाईलवर पाहू शकाल. तसेच जिओ सिनेमा वरूनही तुम्ही फ्री मध्ये क्रिकेट सामने पाहण्याचा आनंद लुटू शकता.