ICC ODI Ranking : शुभमन गिल ठरला जगातील नंबर 1 फलंदाज; बाबर आझमला टाकलं मागे

0
1
ICC ODI Ranking shubman gill
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या क्रिकेटचे वर्ल्ड कप सुरु आहे. त्यामुळे कोणत्या क्रिकेटरचे किती रन झाले. कोणी कुणाची विकेट घेतली यावर्ती सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यातच आता भारतीयांना अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) हा एकदिवसीय क्रिकेट मधील जागतिक क्रमवारीत (ICC ODI Ranking) अव्वल ठरला आहे. शुभमन गिलने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. विशेष म्हणजेच वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी शुभमन गिलने हा कारनामा केला आहे.

गिलचे 830 गुण – ICC ODI Ranking

ICC एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) शुभमन गिलचे 830 पॉईंट्स आहेत तर दुसऱ्या नंबर वर असलेल्या बाबर आझमचे ८२४ गन आहेत. बाबर आझम हा 2021 पासून पहिल्या क्रमांकावर होता, मात्र सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत गिलने दमदार कामगिरी केल्याने त्याने बाबरला मागे टाकलं आहे. शुभमनने 2023 मध्ये 63 सरासरीने आणि 103.72 च्या स्ट्राईक रेटने 1449 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या एकूण गुणांमध्ये भर पडली आहे. गेल्या वर्षभरात गिलने 7 शतके आणि 5 अर्धशतके केले आहेत. तसेच एकूण 41 एकदिवशीय सामन्यात 2136 धावा बनवल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा 100 हुन अधिक आहे.

डेंग्यूमुळे चुकले होते वर्ल्डकप मधील सुरुवातीचे सामने

गिलला विश्वचषक सुरु झाल्यावर डेंग्यू झाला होता. त्यामुळे तो पहिले काही सामने खेळू शकला नाही. मात्र पुढच्या झालेल्या सहा सामन्यात त्याने आपली कमाल दाखवली. त्याने 219 धावा करत मेन इन ब्लू संघाला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार रोहित शर्मा सोबत त्याने अनेकदा मोठी भागीदारी रचून भारतीय इंनिंगचा पाया रचला आहे.