ICC ODI Team 2023 । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा ICC ने सर्वात मोठा सन्मान केला आहे. ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या वर्षात अतिशय दिमाखदार कामगीरी केली होती तसेच विश्वचषक स्पर्धेत सुद्धा अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. त्याचीच पोचपावती म्हणून ICC ने त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची कमान सोपवली आहे.
कोणत्या संघाचे किती खेळाडू –
आयसीसीने निवडलेल्या या संघात ६ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे २, ऑस्ट्रेलियाचे २ आणि न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. या संघात पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, इंग्लंडच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आलेलं नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ऑस्ट्रेलियाने 2023 चा वर्ल्ड कप जिंकला त्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यालाही या ऑल टाइम बेस्ट संघात स्थान मिळालेलं नाही.
आयसीसीच्या या संघात (ICC ODI Team 2023) कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिलची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर मधल्या फळीत विराट कोहली, ट्रेविस हेड, डार्लि मिचेल, हेनरिक क्लासेन याना संधी देण्यात आली आहे. हेनरिक क्लासेन हाच संघाचा यष्टीरक्षक सुद्धा असेल. या संघात ऍडम झम्पा आणि कुलदीप यादव असे २ फिरकीपटू असतील तर , मोहम्मद सिराज, मार्को यानसेन आणि मोहम्मद शमी अशा ३ आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा समावेश या संघात आहे.
आईसीसी चा सर्वश्रेष्ठ वनडे संघ 2023- ICC ODI Team 2023
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डेरिल मिचेल, हेनरिक क्लासेन, मार्को यानसेन, ऍडम झम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी