आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत के.एल राहुलने घेतली मोठी झेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ५-० या फरकाने खिशात घातली. या मालिका विजयाबरोबरच भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा टी-२० मालिका जिंकत टी-२० क्रिकेटमध्ये ५ सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश देण्याचा पराक्रम केला. असा पराक्रम करणारा भारत हा एकमेव संघ ठरला आहे.

दरम्यान या मालिकेत के.एल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी तडाखेबंद आणि मोक्याच्या क्षणी धावा केल्याने भारताने मालिकेतील प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडला चितपट केले. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांनी चमक दाखवत न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घातली.

मालिकेत आपल्या संघासाठी विशेष कामगिरी बजावल्याबद्दल के.एल राहुलने मालिकावीराचा किताबही पटकावला. या मालिकेत राहुलने २०० पेक्षा जास्त धावा केल्या. याच कामगिरीचा परिणाम के.एल राहुलच्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत झाला असून राहुलने सहाव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. रोहित शर्मानेही अखेरच्या सामन्यात ६० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीचा त्याला आयसीसीच्या क्रमवारीत फायदा झालेला दिसत आहे. रोहित शर्माच्या स्थानातही सुधारणा झालेली असून तो दहाव्या स्थानावर आला आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरचं प्रेक्षकांची रजा घेणार

दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी