Take a fresh look at your lifestyle.

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरचं प्रेक्षकांची रजा घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून सुरू झालेली मालिका आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. संभाजी राजेंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, त्यांचा इतिहास सांगणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचली. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

त्याचबरोबर शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका आता छोट्या पडद्यावरून निरोपाच्या तयारीला लागली आहे.

या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक जोरदार तयारी करत आहेत. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते. इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं अमोल कोल्हे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी

शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती