ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा!! वर्ल्डकप उद्घाटन सोहळा रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) उद्यापासून सुरु होणार आहे. दर ४ वर्षांनी होणारी ही स्पर्धा यंदा भारतात होणार असलयाने भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे आणि आनंदचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच क्रिकेट प्रेमींची मोठी निराशा झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वर्ल्ड कप सुरु होण्याआधी आयोजित करण्यात आलेल्या उदघाटन समारोह रद्द झाल्याची बातमी काही मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. आज म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी गुरुवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम का रद्द करण्यात आला याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

उदघाटनासाठी बॉलीवूडच्या कलाकारांना आमंत्रण

बीसीसीआयने भव्य उदघाटन सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी बॉलीवूड मधील स्टार कलाकार कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. ज्यामध्ये रणवीर सिंह, अरिजित सिंह, तमन्ना भाटिया, श्रेया घोषाल आणि आशा भोसले यांचा समावेश होता. फटाके आणि लेसर शो चे देखील नियोजन करण्यात आले होते.मात्र एनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 2023 मध्ये होणारा वर्ल्ड कप सुरुवातीपासूनच वादाच्या भोव्हऱ्यात अडकलेला दिसून येत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने वर्ल्डकप संदर्भात असलेल्या वेळापत्रकावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही रिपोर्टनुसार तिकीट वितरणात झालेली गडबड हे एक कारण होते. यामुळे क्रिकेटप्रेमिची आधीच बरीच निराशा झाली होती. त्यावर तोडगा निघताच उदघाटन समारोह रद्द झाल्यामुळे क्रिकेटप्रेमीचा पारा चढला आहे.

कार्यक्रम रद्द का झाला? ICC World Cup 2023

संपूर्ण वर्ल्डकप (ICC World Cup 2023) दरम्यान असा समारोह आयोजित केला जाईल असे भाकीत व्यक्त केले जात आहे. भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅच पूर्वी रद्द झालेला समारोह आयोजित केला जाईल. असे काही माध्यमातून सांगितले जात आहे. पण आयोजित कार्यक्रम का रद्द करण्यात आला या बद्दल अधिकृत कोणतीही माहिती समोर समोर आलेली नाही.