व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता कर्जावरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये ICICI बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून MCLR च्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली गेली ​​आहे. ज्याच्या परिणामी बँकेचे कर्ज 0.10 टक्क्यांनी महागले आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून हे वाढीव दर लागू झाले आहेत.

ICICI Bank is a darling of investors, what could go wrong?

2022 मध्ये RBI ने रेपो दरात आतापर्यन्त 3 वेळा मिळून 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. यानंतर जवळपास एका महिन्यात ICICI Bank ने MCLR दर वाढवले ​​आहेत. देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने ही वाढ केल्याचे म्हंटले आहे. सध्या देशात चलनवाढीचा दर 6 टक्क्यांहून जास्त आहे, जो RBI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

ICICI Bank Q1 Results: Net profit up 50% YoY to Rs 6,905 cr; NII jumps 21%  to Rs 13,210 cr - BusinessToday

आता कर्ज महागणार

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार,ICICI Bank च्या MCLR दरांमध्ये 10 बेसिस पॉईंटने वाढ केल्यामुळे होम,ऑटो आणि पर्सनल लोनसह सर्व प्रकारची कर्जे महागतील. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMI वर होणार आहे.

ICICI Bank's Q4 metrics justify its recent valuation re-rating | Mint

अशा प्रकारे असतील नवीन दर असतील

ओव्हरनाईट : जुना दर – 7.55 टक्के, नवीन दर – 7.65 टक्के
एक महिना : जुना दर – 7.65 टक्के, नवीन दर – 7.75 टक्के
तीन महिने : जुना दर – 7.70 टक्के, नवीन दर – 7.80 टक्के
सहा महिने : जुना दर – 7.95 टक्के, नवीन दर 7.85 टक्के
एक वर्ष : जुना दर – 7.90 टक्के, नवीन दर 8.00 टक्के

PNB Q1 results: Net profit slumps 70% YoY to Rs 308 cr - BusinessToday

PNB ने देखील वाढवले दर

PNB कडूनही MCLR च्या दरात 5 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांच्या कर्जाच्या EMI मध्येही वाढ होणार आहे. यानंतर आता PNB च्या ओव्हरनाईट बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट 7.00 टक्क्यांवरून 7.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ICICI Bank

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates.page

हे पण वाचा :

गेल्या 5 वर्षात Best Agrolife च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 6,900 टक्के रिटर्न !!!

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Karnataka Bank ने सुरु केली नवीन कालावधीची FD, बघा किती मिळतंय व्याज !!!

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर