हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे असं मत इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलंय. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
डॉ. बलराम भार्गव मंगळवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसंच बंगळुरुचा समावेश आहे
ते पुढे म्हणाले, देशातील कोरोनाच्या नवीन म्युटेंटमुळे तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तसेच तरुण लोक हे मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्यानेही त्यांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे.
गेल्या माहिन्यात कोविड टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत डॉ.बलराम भार्गव यांनी देशात लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना सांगितलं होतं की, राज्यांनी मायक्रो कन्टेन्मेन्ट झोनवर लक्ष केंद्रीत करावं आणि लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा असावा.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.