हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवास हा अनेकांसाठी आल्हाददायक असतो. प्रवासादरम्यान येणारे अनुभव प्रत्येकांसाठी खास असतात. काही वेगळं शिकवून जाणारे ठरतात. परंतु ‘आयकॉन ऑफ द सींज’ काही असाच अनुभव देणारा ठरेल. जवळपास १,२००फीट (३६६मी.) उंची असलेलं विश्वातील हे सर्वात मोठं जहाज ठरणार आहे. १९-२० मजली ह्या जहाजात ५,६१० यात्रेकरू आणि २,३५० चालक वर्ग प्रवास करु शकतात. पुढल्या वर्षीपासून या जहाजाची सुरुवात होणार असून यात्रेकरूंसाठी नक्कीच हा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
अधिकृत साइटनुसार वेस्टर्न कॅरेबियनमध्ये ७ रात्री आणि मियामी, फ्लोरिडा येथून सुरू होणाऱ्या क्रूझवर एक अप्रतिम डे- जर्नी केली जाऊ शकते. यात्रेतील सोयींनुसार प्रति यात्रेकरुचे भाडे ठरवण्यात येईल. अमेरिकन डॉलर्स नुसार प्रति व्यक्ती १,८७६ (१,५५,१४५ रुपये) पासून २,४९७ अमेरिकन डॉलर्स ( २,०५ ००३ रुपये) अशी दरांची श्रुंखला मांडली गेली आहे. तरीही वेळेनुसार होणारे बदल आणि किंमतील चढ-उतार ग्राह्य धरले पाहिजेत.
मिळतात ‘या’ सर्व सुविधा-
जहाजाच्या अविश्वसनीय आकाराव्यतिरिक्त या जहाजाहात यात्रेकरूंसाठी अनेक मनोरंजक गोष्टींचे सुविधा उपलब्ध केली गेली आहे. सहा रेकॉर्ड ब्रेकिंग स्लाईड सोबत हा सर्वात मोठा वॉटर पार्क असण्याचा दावा जहाजाच्या मालकांनी केलेला आहे. जहाजात ७ पूल आणि ९ वरपूल असतील. १९ पेक्षा अधिक मजले असलेल्या या जहाजावरून नयनरम्य दृश्यांचा मनसोक्त आनंद लुटता येईल. या जहाजावर १५ पेक्षा अधिक बझिंग स्पॉट आणि लाईव्ह म्युझिक वेन्यू हे देखील यात्रेकरूंचा प्रवास आरामदायी करणार आहेत. खाद्यपानाच्या विषयी दक्षता घेतली गेली आहे त्यानुसार कृझवर वीस प्रकारच्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची मांडणी केली जाईल, प्रवाशांना हव्या असलेल्या हर एक चवीची दखल यात घेतली जाईल.
मायकोनोसचा मुड आणि मैलोर्काची मानसिकता दर्शवणाऱ्या क्रूज मध्ये एक क्लब प्रेरित हायडवे आहे, जिथे आराम फरमावत मनशांती अनुभवता येईल. जहाजात असलेला सस्पेंडेड इन्फिनिटी पूल, समुद्रातील पहिला अविष्कारीक सिग्नेचर पूल असून तो आपल्या प्राकृतिक सौंदर्यमुळे ओळखला जाईल. या विशाल जहाजाच्या कल्पनेनेच अनेक लोकांच्या मनात भुरळ घातली आहे, कितीतरी पर्यटक या जहाजाप्रती आकर्षित होताना दिसतात. ट्विटरवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. काही लोकांनी तर याची तुलना टायटॅनिक सोबत केलेली आहे.