हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता IDBI Bank ने देखील आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देत फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी व्याजदरात वाढ केली आहे. वास्तविक, बँकेने आपल्या ग्राहकांना 700 दिवसांच्या FD वर 7.60 टक्के व्याज दर दिला आहे.
26 डिसेंबर 2022 पासून पासून नवीन दर लागू
आता IDBI बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, IDBI Bank रिटेल अमृत महोत्सव डिपॉझिट्सवर 7.60 टक्के व्याज देत आहे. हे नवीन दर 26 डिसेंबरपासून 2022 पासून लागू आहेत. तसेच मर्यादित कालावधीची ऑफर म्हणून, बँकेकडून 700 दिवसांच्या FD वर 7.60% पर्यंत व्याज दर दिला जातो.
19 डिसेंबर रोजी देखील वाढवले होते एफडीचे दर
बँकेने याआधी 19 डिसेंबरपासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली होती. यानंतर, सध्या बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर सर्वसामान्यांना 3.00 टक्के ते 6.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.00 टक्के व्याजदर दिला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘या’ विशेष योजनेची मुदत वाढवली
ज्येष्ठ नागरिकांसाठी, IDBI Bank कडून नमन सीनियर सिटीजन डिपॉझिट्स स्पेशल रिटेल टर्म डिपॉझिट्स स्कीम ऑफर केली जाते. याची मागील शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 अशी देण्यात आली होती. आता बँकेकडून याला 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idbibank.in/interest-rates.aspx
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये