हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून लवकरच IDBI Bank चे खासगीकरण केले जाणार आहे. यामधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी आता कार्लाइल ग्रुप, फेअर फॅक्स फायनशिअल होल्डिंग्स आणि DBS Bank ने रस दाखविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कंपन्या यामध्ये 10 टक्क्यांसाठी बोली लावण्यावर विचार करत आहेत. मात्र, याच दरम्यान बुधवारी या बँकेच्या शेअर्सने गेल्या 52 आठवड्यांची ऑल टाईम हाय पातळी गाठली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IDBI Bank मधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी कार्लाइल ग्रुप, फेअर फॅक्स फायनशिअल होल्डिंग्स आणि DBS Bank ने डिपार्टमेंट ऑफ इनवेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्याच बरोबर अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि IDBI चे इनवेस्टमेंट बँकर KPMG बरोबरही चर्चा केली आहे. मात्र, कार्लाइल ग्रुप, फेअर फॅक्स, इनवेस्टमेंट बँकर KPMG च्या प्रवक्त्यांनी याविषयी आणखी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर आत्ताच काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
याच दरम्यान IDBI Bank च्या शेअर्स मध्ये मोठी उसळी आल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ते 60.50 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. सध्या हे शेअर्स गेल्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. हे लक्षात घ्या कि, बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा हे शेअर्स 58.80 रुपयांवर बंद झाले.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=IDBI
हे पण वाचा :
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर