IDFC First Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता द्यावा लागणार जास्त EMI

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका बँकेचे नाव जोडले गेले आहे. IDFC First Bank ने ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या विविध कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

8 ऑक्टोबर 2022 पासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत. यानंतर IDFC फर्स्ट बँकेचा बेस रेट 9.50 टक्क्यांवर गेला आहे. IDFC फर्स्ट बँकेचा एक दिवस ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 8.05 ते 8.75 टक्क्यांच्या श्रेणीत आहे.

IDFC First Bank hikes interest rates on fixed deposits: Check new rates here | Mint

EMI मध्ये होणार वाढ

IDFC First Bank च्या MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI मध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घ्या की बहुतेक कंझ्युमर लोन हे एका वर्षाच्या MCLR वर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महागण्याची शक्यता आहे.

IDFC First Bank Launches QIP To Raise Funds; Shares Fall

MCLR काय आहे ???

MCLR ही RBI कडून विकसित करण्यात आलेली एक पद्धत आहे ज्याआधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. IDFC First Bank

rbi on cryptocurrency: RBI to seek review of Supreme Court order on cryptocurrency - The Economic Times

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. IDFC First Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/personal-banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates

हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळेल 7 टक्क्यांहून जास्त व्याज, व्याज दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Whatsapp आणणार नवं फीचर्स; ग्रुप मेम्बर्सची संख्या 1024 होणार
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा