Whatsapp आणणार नवं फीचर्स; ग्रुप मेम्बर्सची संख्या 1024 होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावरील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सना नेहमीच अनेक नवनवीन फीचर्स देत असतं. आता व्हाट्सअँप असाच एक नवा बदल करण्याच्या तयारीत आहे त्यानुसार व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १०२४ सदस्य जोडता येतील. यामुळे व्हाट्सअँप वापरणे आणि ग्रुप चॅटिंग करणे अजून मजेशीर होईल.

या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या 256 सदस्यांवरून 512 करण्यात आली. आता हीच सदस्य संख्या अजून दुप्पट करण्याचा विचार सुरु आहे. WhatsApp अपडेट्सची माहिती देणारे प्लॅटफॉर्म WABetaInfo नुसार, व्हाटसअप सध्या 512 सदस्य असलेल्या ग्रुपच्या मर्यादामध्ये काही बदल करण्याचे टेस्टिंग घेत आहे. आता अॅडमिनला एका ग्रुपमध्ये 1,024 सदस्य जोडण्याचा पर्याय दिला जाणार आहे. या फीचरची बीटा यूजर्ससोबत चाचणी केली जात असून निवडक बीटा यूजर्सना या फीचरचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅपने बिझनेस अॅप वापरणाऱ्या यूजर्सना व्हॉट्सअॅप प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील सुरू केले आहे. सध्या तरी फक्त काही यूजर्सना त्याचे अपडेट मिळत आहे. व्हॉट्सअॅप प्रीमियमचे अपडेट बीटा यूजर्स साठी जारी करण्यात आले आहे. बीटा यूजर्स त्यांच्या अॅपमध्ये प्रीमियम मेनू पाहू शकतात. यूजर्सना प्रीमियम मेनूमध्ये अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतील.