औरंगाबाद | कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण सूरु आहे. 21 मे पर्यंत केवळ 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. आता 21 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकाचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर लसीकरणाला वेग देण्यासाठी मनपाने नवीन योजना आखली आहे.
लसीकरणाच्या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी सोसायट्यांमध्ये कॅम्प लावण्याचाही निर्णय घेतला जात आहे. सोसायटीमधील दोनशे लाभार्थ्यांची यादी सादर केली तर सोसायटीत लगेचच लसीकरणाचा कॅम्प लावण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने एक मोबाईल टीम सुद्धा स्थापन केली आहे. आतापर्यंत 21 मेपर्यंत फक्त 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. आता 21 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लस देण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे लसीकरणाची संख्या वाढली असून 70 केंद्रावर दररोज सुमारे 12 ते 14 हजार नागरिकांना लस दिली जात आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी माहिती दिली.
आतापर्यंत विविध वयोगटातील तीन लाख 79 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्याचबरोबर लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी महापालिकेकडून सोसायटीमध्ये लसीकरण शिबिराची तयारी करण्यात आली आहे. यासाठी खास लसीकरणाची मोबाईल टीम देखील तयार करण्यात आली. सोसायटीत दोनशे लाभार्थ्यांची यादी सादर केल्यास लवकरात लवकर कॅम्प लावण्यात येईल. लसीकरणासाठी स्वतंत्र हॉल किंवा बसण्यासाठी मोकळी जागा आणि लस देण्यासाठी स्वतंत्र रूम आणि वेटिंग रूमची व्यवस्था करावी लागणार आहे. त्याचबरोबर मोबाईल टीम सोसायटीत येईल आणि लसीकरण केले जाईल असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.