रुग्णसंख्येत पुन्हा वाढ : सातारा जिल्ह्यात आज नवे 814 पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसते. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 814 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 748 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 538 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 89 हजार 583 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 76 हजार 613 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 278 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 24 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 9 हजार 810 जणांचे नमुने घेण्यात आले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश जारी : खाजगी लॅबनी रॅपिड ऍन्टीजन टेस्ट रिपोर्ट आयसीएमआर पोर्टलवर भरणे बंधनकारक

सातारचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे कि, सातारा जिल्ह्यात शासकीय व खाजगी कोविड रॅपीड अँटीजन टेस्ट तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील सर्व खाजगी लॅब संस्थांनी त्यांचेकडे होणाऱ्या रॅपीड टेस्टचे रिपोर्ट देताना रुग्णांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन आयसीएमआर आयडी तयार केल्याशिवाय संबंधितांना रिपोर्ट देण्यात येऊ नयेत. जे खाजगी लॅबधारक रॅपीड टेस्टचे रिपोर्ट आयसीएमआरच्या पोर्टलवरुन डाऊनलोड करुन न देता त्यांचे स्वत:च्या लॅबच्या लेटरपॅडवर अथवा अन्य मार्गाने रिपोर्ट संबंधितांना दिल्याचे आढळल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कारवाई करून संबंधित लॅब सिल करुन परवाना रद्द केले जातील