अश्विन बाहेर होऊ शकतो, तर विराट का नाही? कपिल देव यांनी साधला विराट कोहलीवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मवर भाष्य केले आहे. जर रविचंद्रन अश्विन सारखा प्रभावशील गोलंदाज कसोटी संघातून बाहेर होऊ शकतो तर मग मोठ्या कालावधी पासून लौकिकाला साजेशी कामगिरी करत नसलेला विराट कोहली (Virat Kohli) टी- 20 संघातून पायउतार झाला तर त्यात चूक ते काय?, असे म्हणत कपिल देव यांनी विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला आहे. विराट कोहलीला जवळपास मागील तीन वर्षांपासून एकही मोठी खेळी करता आली नाही.

अश्विन बाहेर होऊ शकतो तर मग विराट का नाही?
“जर आपण कसोटीमधील दुसरा सर्वोत्तम गोलंदाज रविचंद्रन अश्विनला बाहेर ठेवू शकतो तर जगातील एक नंबरचा फलंदाज देखील बाहेर होऊ शकतो. तसेच मलाही वाटते की कोहलीने (Virat Kohli) धावा कराव्या, मोठी खेळी करावी मात्र सध्या त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे. याची सर्वांना कल्पना आहे. त्याने त्याच्या खेळीनेच क्रिकेट विश्वात नाव कमावले आहे. मात्र तो चांगले प्रदर्शन करत नसला तर तुम्ही नवीन खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही”, असे स्पष्ट मत कपिल देव यांनी मांडले आहे.

फॉर्मच्या आधारावर संघाची निवड व्हायला हवी
संघातील प्लेइंग इलेव्हनची निवड खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर करायला हवी. जर संघाकडे खूप पर्याय असतील तर सध्या लयनुसार खेळत असलेल्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे. तुम्हाला फक्त प्रतिष्ठेच्या आधारावर जाता येणार नाही. त्यासाठी सध्याच्या फॉर्मच्या आधारे खेळाडूंची निवड करावी लागेल, असे कपिल देव म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment