टीम हॅलो महाराष्ट्र। लष्कराचे उपप्रमुख असलेल्या मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद (एम. एम.) नरवणे यांनी मंगळवारी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून मंगळवारी ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत.
दरम्यान आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे लष्कर प्रमुख मनोज मुंकुंद नरवणे यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असून देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल सैन्यदलाचे जवान हे देश सुरक्षित ठेवतील. आम्ही देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही लष्करप्रमुख नरवणे यांनी देशवासियांना दिली.
हे पण वाचा –
2020 हे लीप वर्ष; जाणून घ्या, लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष का निर्माण होते?
नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट
अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान
देशाच्या लष्करप्रमुखपदी मराठी माणूस! मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार