पाचगणी | पाचगणी नगरपालिकेला महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी स्थानिक आमदार निधीतून रुग्णवाहिका दिली आहे. पाचगणी नगरपालिका कोव्हीड कार्यकाळ संपल्यानंतर रुग्णवाहिका भाडे निश्चिती करण्याचा फतवा पाचगणी नगरपालिकेने संमत केला आहे. पाचगणी नगरपालिकेच्या या फतव्याविरोधात रुग्णवाहिकेच्या भाडे निश्चितीबाबत नगरपालिकेच्या गैर जबाबदार भूमिकेविरोधात भाडेनिश्चिती रद्द करावी. अन्यथा पाचगणी व परिसरातील लोकांच्या आरोग्याकरीता पाचगणी नगरपालिके विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिला आहे.
माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की. महाबळेश्वर, वाई, खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी पाचगणी शहरातील रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवण्याकरीता स्थानिक आमदार निधीतून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा. सदैव मोफत रुग्णवाहिका नगरपालिका पाचगणी यांना दिली असताना. पाचगणी नगरपालिकेने कोव्हीड काळ सपंले नंतर रुग्णवाहिकेचा भाडे निश्चित करण्याचा ठराव केला आहे. पाचगणी नगरपालिकेची रग्णवाहिकेची सोय पुर्णता मोफत असताना भाडे निश्चितीचा निर्णय पुर्णता चुकीचा आहे.
महाबळेश्वर मतदार संघाचे आमदारांनी पाचगणी नगरपालिकेस दिलेली रुग्णवाहिका मोफत असताना. सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचा नगरपालिकेचा निर्णय बेकायदेशीर आहे. पाचगणी नगरपालिका सर्वसामान्य जनतेला वेठीस धरुन आमदारांच्या भुमिकेला बदनाम करण्याचा डाव टाकत आहे. पाचगणी शहरातील सर्वसामान्य जनतेला मुलभूत आरोग्यसेवा देण्याकरीता आमदार सक्षम असताना पाचगणी नगरपालिकेने केलेला ठराव त्वरीत रद्द करावा. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरीता पाचगणी नगरपालिकेच्या भाडे निश्चितीच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिला आहे.