ठरलं तर! विद्यापीठात ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळी सुट्टया 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठात उन्हाळी सुट्ट्यांचा विषय गाजत होता. अखेर काल कुलगुरूंनी प्राध्यापकांसाठी 21 मे पासून सुट्टीचा निर्णय जाहीर केला. नियोजित वेळापत्रकानुसार 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या तारखेत बदल केला असून, आता महाविद्यालय 9 जुलै पासून तर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग 27 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

यंदा उन्हाची तीव्रता वाढत असून, प्राध्यापकांना महाविद्यालये, विद्यापीठातील विभागात जावे लागते. मात्र विद्यार्थीच येत नाहीत. त्यामुळे प्राध्यापक संघटना, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे 1 जूनपासून पदवी तर 21 जून पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. त्यानंतर पेपर तपासणीचे काम आहे. सुट्ट्यांचा निर्णय घेतल्यास या बाबींवर परिणाम होऊ शकतो. असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत तोडगा काढण्याचे सूचित करण्यात आले. अधिष्ठाता मंडळाने शैक्षणिक वर्षाची तारीख अलीकडे घेऊन परीक्षा व पेपर तपासणीसाठी प्राध्यापकांना सहकार्य करावे लागेल. या अटीवर 21 मे पासून महाविद्यालयीन प्राध्यापकांना 49 दिवस तर विद्यापीठीय प्राध्यापकांना 37 दिवस सुट्टीची शिफारस केली.

 

अशा राहतील प्राध्यापकांना सुट्टया – 

महाविद्यालयीन प्राध्यापकांना 21 मे ते 8 जुलै पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील व नवीन शैक्षणिक वर्ष अर्थात 9 जुलैपासून महाविद्यालय उघडतील. विद्यापीठातील प्राध्यापकांना 21 मे ते 26 जून पर्यंत सुट्ट्या राहतील व नवीन शैक्षणिक वर्ष 27 जून पासून सुरू होईल असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment