पक्षांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मुलांच्या केसाला धक्का लागल्यास सोडणार नाही ः नरेंद्र पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी काल जी काही दादागिरीची भाषा केली ती शोभणारी नाही. मुलं कुठल्याही पक्षांची सभासद नाहीत, कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून केलेले नाही. सातारा पोलिसांनी संपूर्ण चाैकशी करावी. व्हिडिअोतील मुलांच्या कुटुंबाला धमकी दिली आहे.  मुलांच्या केसाला धक्का लागला तर मराठा समाज कुणालीही सोडणार नाही, असा सज्जड दम शशिकांत शिंदे यांचे नांव न घेता माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजील जे काही उत्स्फुर्तपणे करत आहे. जर अशा लोकांना त्रास होत असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक सत्ताधारी आमदाराने काळजी घेणे गरजेचे आहे.  मराठा पेटलेला आहे. मराठा तुरूणांच्या भावनेला ठेच पोहचवलेली आहे. तुम्हांला आरक्षणांची गरज नाही. तुमच्या चार- चार पिढ्या बसून खावू शकतात, तुमचे साखर कारखाने आहेत. तुमचे बॅंका आहेत, उद्योगपती आहात.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे मुलांच्यात खूप वाईट प्रतिक्रिया आहे. साताऱ्यात सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर काही तोडफोड केली असावी. दगडफेक किंवा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर शेणी पेटविल्या. मराठा समाजातील तरूणांचा राग व्यक्त झाला तो योग्य असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.