“जर ते शेतकरी नसून खलिस्तानी, पाकिस्तान-चीनचे एजंट, आहेत तर सरकार त्यांच्याशी चर्चा का करतंय?”; चिदंबरम यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारने आणलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून 14 डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केलं जात आहे. शेतकरी संघटनांचे नेते सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) काही नेत्यांनी शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी असल्याचाआरोप केला तर काहींनी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला. असे आरोप करणाऱ्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (p.chidambarm) यांनी एक सवाल केला आहे.

“सत्ताधारी मंत्र्यांनी शेती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तान आणि चीनचे एजंट, नक्षलवादी म्हटलं आहे. हल्ली तर त्यांचा उल्लेख हे मंत्री तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसत आहेत. जर तुम्ही असे आरोप करत आहात तर याचा अर्थ या हजारो आंदोलनकर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही. जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?” असा कोंडीत पकडणारा प्रश्न पी चिदंबरम यांनी सत्ताधारी नेत्यांना विचारला आहे.

पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment