हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण जेव्हा कोणतेही आर्थिक व्यवहार करतो, म्हणजे एखादे बँक खाते उघडायचे असेल, डिमॅट खाते उघडायचं असेल किंवा इतर कोणतेही आर्थिक गुंतवणूक करताना नवीन खाते उघडायचे असेल, तर त्यासाठी नॉमिनी (Nominee) खूप गरजेचा असतो. अगदी तुम्ही साधे बँकेत सेविंग अकाउंट जरी उघडायला गेलात, तरी बँकेचे कर्मचारी तुम्हाला नॉमिनीचे नाव लिहिण्यास सांगतात. नॉमिनीचे नाव घेताना त्याचे खातेदाराशी असलेले संबंध काय आहेत? वय, पत्ता या सगळ्याची माहिती घेतली जाते. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या अकाउंटमधील जे काही पैसे आहेत किंवा त्या गोष्टींचे वारसदार हा तुमचा नॉमिनी असतो. म्हणजे जर तुमचा मृत्यू झाला, तर तुमच्या अकाउंटमध्ये असलेले पैसे त्या व्यक्तीकडे जातात. परंतु जर बँकेच्या खात्याला नॉमिनी बनवले नसेल, तर तुमच्या बँकेतील पैसे नक्की कोणाकडे जातात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचीच माहिती आपण जाणून घेऊया.
एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात असलेले सगळे पैसे हे त्याच्या नॉमिनीला दिले जातात. जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त नॉमिनी केले असतील, तर जे पैसे आहेत ते समान सगळ्यांना दिले जातात. आणि कशा बँक आहे ज्यांच्या बँकांमध्ये एका पेक्षा जास्त नॉमिनी तुम्ही बनवू शकता. त्यानंतर तो व्यक्ती त्यांच्या मृत्यूनंतर कोणाला किती हिस्सा द्यायचा? हे देखील सांगत असतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या खातात काही रक्कम असेल, तर तो व्यक्ती त्याच्या खात्याला एकापेक्षा जास्त नॉमिनी ठेवू शकतो? आणि तो व्यक्ती आधीच सांगू शकतो की, त्याच्या मृत्यूनंतर कोणाला किती पैशांचे वाटप करावे.
नॉमिनी नसेल तर पैसे कोणाला मिळतात
जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या बँक खात्याला नॉमिनी केले नसेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात असलेले पैसे हे त्याच्या कायदेशीर वारसाला जातात. म्हणजेच विवाहित व्यक्तीचे कायदेशीर वारस हे त्याची पत्नी मुले आणि पालक असतात. तर मृत व्यक्ती जर खात अविवाहित असेल, तर त्याच्या आई वडील आणि भावंड हे त्याचे कायदेशीर वारस असतात. म्हणून त्यांना हे पैसे जातात. परंतु जर नॉमिनी केले नसेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसदारांना खूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याने बँक खात्यासाठी नॉमिनी केली नसेल, तर ते पैसे त्याच्या कायदेशीर वारसाला दिले जातात. त्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता बँकेची शाखेत केली करावी लागते. यासाठी मृत खातेधारकाचे तुम्हाला मृत्युपत्र जमा करावे लागते, कायदेशीर वारसाचे फोटो, केवायसी लेटर ऑफ डिस्प्लेमर, बँकेच्या मागणीनुसार तुम्हाला इतर कागदपत्र देखील जमा करावी लागतील.