भाजपला ठेचायचे असेल तर आम्हाला डिवचू नका, प्रेमाने वागा

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांकडे व्यक्त केल्या भावना.

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

   कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या वादात भाजप वाढत आहे. त्यामुळे भाजपला ठेचण्यासाठी राष्ट्रवादीला सवतीची वागणूक देऊन डिचवू नका. आमचे नेते जयंत पाटील साहेबांवर आरोप करू नका, असे मत सांगली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कमलकार पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. मात्र या बैठकीत विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला.

   महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या बैठकीत बोलताना सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी, कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील मतभेद मिटवणे आवश्यक आहेत. त्यासाठी कॉंग्रेसने एक पाऊल उभे यावे आम्ही देखील येतो. मात्र आम्हाला सवतीची वागणूक द्यावी. नागाने फणा काढला आहे. असे विशाल पाटील तुम्हाला वाटते ना, या नागाला ठेचण्याची काम राष्ट्रवादी करेल. मात्र ‘खाऊन जात गाव आणि जयंत पाटलांच नाव’ अशी परिस्थिती निर्माण करू नका.

  विशाल पाटील यांनी झारीतील शुक्राचार्य विश्‍वजीत कदम यांना म्हटले नसल्याचा खुलासा केला. मग ते म्हटले कुणाला? असा सवाल त्यांनी केला. विशाल पाटील आक्रमक नेतृत्व आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही पक्षांवर विशाल पाटील फ्री आहेत. त्यामुळे तुम्ही जरूर खासदार होणार. मात्र साहेबांना भविष्यात डिचवू नका. आमच हाय तर हाय आणि नाय तर नाय, असे असते. त्यामुळे राष्ट्रवादी व आ.जयंत पाटील यांच्याबरोबर प्रेमाने वागावे, असे मत कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.