नवी दिल्ली । जर तुम्ही देखील स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता (Residential Property) खरेदी करण्याची संधी मिळत आहे. SBI मालमत्तांचा लिलाव करणार आहे. 25 ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. या अशा मालमत्ता आहेत ज्या डीफॉल्टच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. याविषयीची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) ने दिली आहे.
बँक ज्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे त्यात रेसिडेंशिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल, एग्रीकल्चर प्रापर्टीजचा समावेश आहे.
लिलाव कधी होणार ?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे की,’ हा मेगा ई-लिलाव 25 ऑक्टोबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये रेसिडेंशिअल आणि कमर्शिअल प्रापर्टीजचा ई-लिलाव केला जाईल. आपण येथे वाजवी किंमतीत प्रापर्टीज खरेदी करू शकता.’
Your next big investment opportunity is here! Join us during the e-auction and place your best bid.
Know more: https://t.co/vqhLcagoFF#Auction #EAuction #Properties #SBIMegaEAuction pic.twitter.com/8EsLUlDkI5— State Bank of India (@TheOfficialSBI) October 19, 2021
रजिस्ट्रेशन कुठे करावे ?
इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी e Bkrayचे पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
KYC डाक्यूमेंट आवश्यक असेल
बोलीदाराला आवश्यक KYC डाक्यूमेंट अपलोड करावी लागतील. ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे KYC डाक्यूमेंटचे व्हेरिफिकेशन केले जाईल. याला 2 दिवस लागू शकतात.
अधिक माहितीसाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
या प्रापर्टीजच्या लिलावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही या लिंक https://bank.sbi/web/sbi in the news/auction notices/bank e auctions ला भेट देऊ शकता.
बँक वेळोवेळी करते लिलाव
मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली नाही किंवा काही कारणास्तव ते देऊ शकलोले नाही. त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांकडून ताब्यात घेतल्या जातात. अशा मालमत्तांचा वेळोवेळी बँकांकडून लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.