नवी दिल्ली । जर तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, पण पैशांची समस्या असेल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. केंद्र सरकार तुम्हाला 25 लाख रुपयांचा फंड देईल, जरी यासाठी एक चॅलेंज पूर्ण करावे लागेल. केंद्र सरकारने नेक्स्ट जनरेशन स्टार्ट-अप चॅलेंज स्पर्धा ‘चुनौती 2.0’ नावाने सुरू केली आहे. मात्र, हे स्टार्टअप्स केवळ काही निवडक क्षेत्रांमध्येच काम करतील. सरकारकडून त्यांना फंड व्यतिरिक्त इतरही सुविधा पुरवल्या जातील.
महिलांना करिअर करण्याची मिळेल संधी
नेक्स्ट जनरेशन इनक्यूबेशन स्कीम (NGIS) चॅलेंज 2.0 स्टार्टअप चॅलेंजसाठी महिला उद्योजकांवर लक्ष केंद्रित करत आउटरीच वेबिनार आयोजित केले. या स्टार्टअपमध्ये महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे.
Participate in the STPI’s NextGen Start-up Challenge contest and stand a chance to win seed funds of upto Rs.25 Lakhs. Apply before 31st August 2021. Visit: https://t.co/Tv1oUtEv5j @stpiindia @MSH_MeitY @PIB_India @MIB_India pic.twitter.com/up3K65qkLw
— MyGovIndia (@mygovindia) August 19, 2021
छोट्या शहराच्या स्टार्टअप्सना फायदा
छोट्या शहरातील स्टार्टअप्सना या स्पर्धेच्या माध्यमातून फायदा होईल. या चॅलेंज प्रोग्रॅम द्वारे निवडलेल्या स्टार्टअप्सना देशभर पसरलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कद्वारे सरकारकडून विविध प्रकारची मदत दिली जाईल.
या स्टार्टअप्सना मदत मिळेल
Edu-Tech, Agri-Tech आणि Fin-Tech Solutions, Supply Chain, Logistics and Transport Management, Infrastructure and Remote Monitoring, Medical Health Care, Solutions, Prevention and Psychiatric Care, Jobs and Skills.
येथे रजिस्ट्रेशन करा
सरकारने चालवलेल्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी https://ngis.stpi.in या वेबसाइटला भेट द्या.
या तारखेपूर्वी अर्ज करा
‘चॅलेंज’ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे आणि स्टार्टअप्सचे अधिक तपशील वेबसाइटवर पाहिले जाऊ शकतात.