तुम्हीही ब्राउझरवर करत असाल ‘या’ चुका तर वेळीच व्हा सावध, अन्यथा चोरी होऊ शकतो तुमचा डेटा…

browser search alert
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Alert : आज जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. तसेच तो सोशल मीडिया, वेबसाईट आणि अनेक Apps चा वापर देखील करतो. आणि या सर्व गोष्टींचा वापर करण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळे अकाउंट बनवावं लागतं. अकाउंट बनवताना पासवर्ड टाकणं आणि अशा अनेक अकाउंट्सचा वेगवेगळा पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण होतं.

यासाठी अनेक ब्राउजर्स रिमेंबर पासवर्ड्स नावाचं फीचर देतात. ज्याच्या मदतीने पासवर्ड ऑटो-सेव्ह होतो. बरेच लोक ब्राउझरमध्ये पासवर्ड सेव्ह करतात. जेणेकरून पुढच्या वेळी लॉग इन करताना तुम्हाला युजरनेम-पासवर्ड पुन्हा टाकावा लागणार नाही. पण हे फीचर वापरणं सुरक्षित आहे का?

समस्या काय असू शकतात?

जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये पासवर्ड सेव्ह करता तेव्हा ते युजरनेम, पासवर्ड, बिलिंग तपशील आणि क्रेडिट कार्ड क्रमांकही सेव्ह करत असतो. कारण, बहुतेक वापरकर्ते ब्राउझरमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, फिंगरप्रिंट स्कॅन, एक वेळ पडताळणी कोड यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये ठेवत नाहीत.

अशा परिस्थितीत, जर कोणी तुमचे डिव्हाइस हॅक केले, तर तो तुमची ओळखपत्रे चोरू शकतो. पासवर्ड सेव्ह करणे म्हणजे केवळ निष्काळजीपणाच नाही तर याचे इतर अनेक धोके आहेत. ब्राउझरमध्ये इन्स्टॉल केलेल्या अनेक एक्स्टेंशनमध्ये मालवेअर लपलेले असतात. हे मालवेअर सेव्ह केलेला युजरनेम-पासवर्ड सहज चोरू शकतात.

सेव्ह केलेला पासवर्ड कसा काढायचा?

जर तुम्ही युजरनेम-पासवर्ड सेव्ह केला असेल तर काळजी करू नका. तुम्ही त्यांना अगदी सहजपणे हटवू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

पहिली स्टेप्स : तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.

दुसरी स्टेप्स : त्यानंतर मेनूमधील सेटिंग पर्यायावर जा.

तिसरी स्टेप्स : येथे तुम्हाला पासवर्ड मॅनेजर टॅब उघडावा लागेल.

चौथी स्टेप्स : खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला त्या सर्व वेबसाइट्सची यादी दिसेल जिथे पासवर्ड सेव्ह केले आहेत.

पाचवी स्टेप्स : येथून तुम्ही सेव्ह केलेला पासवर्ड काढू शकता.

वरीलप्रमाणे तुम्ही सेव्ह केलेला युजरनेम-पासवर्ड सहजपणे हटवू शकता आणि आपली खाती हॅक होण्यापासून बचावू शकता.