फोन हरवला तर लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा रिकामे होऊ शकेल तुमचे बँक खाते

नवी दिल्ली । स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये बँकिंग डिटेल्स पासून मोबाइल वॉलेटपर्यंत सर काही असते. पण जर तुमचा फोन हरवला तर चोर तुमचे बँक खाते आणि मोबाईल वॉलेटमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर तुम्ही ताबडतोब काही आवश्यक पावले उचलली पाहिजेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे सुरक्षित राहू शकतील.

सिम कार्ड ब्लॉक करा
स्मार्टफोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर, सर्वप्रथम सिम कार्ड तात्काळ ब्लॉक करणे गरजेचे आहे, जेणेकरून चोर फायनान्शिअल सर्व्हिसेसचे OTP किंवा इतर मेसेज पाहू शकणार नाहीत. नंतर तुम्ही नवीन सिम कार्डसह तोच मोबाईल नंबर वापरणे सुरू ठेवू शकता.

इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग एक्सेस ब्लॉक करा
स्मार्टफोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यावर इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग एक्सेस ब्लॉक करा. ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेस ब्लॉक करण्याव्यतिरिक्त, UPI पेमेंट इनऍक्टिव्ह करण्यास विसरू नका. सर्व पासवर्ड रिसेट केल्यानंतरच ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेस पुन्हा वापरण्यास सुरुवात करा.

मोबाइल वॉलेट एक्सेस ब्लॉक करा
पेटीएम, फोनपे, अ‍ॅमेझॉन पे, फ्रीचार्ज सारख्या मोबाईल वॉलेट्सने आपले आयुष्य खूप सोपे केले आहे मात्र जेव्हा मोबाईल फोन चुकीच्या हातात पडतो तेव्हा ते महाग ठरू शकते. फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, मोबाइल नंबरशी लिंक केलेले मोबाइल वॉलेट ब्लॉक करा.

पोलीस ठाण्यात तक्रार करा
जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा कुठेतरी हरवला असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात जा आणि घटनेची तक्रार करा. एफआयआरची कॉपी घ्यायला विसरू नका जेणेकरून फोनचा गैरवापर झाल्यास ती पुरावा म्हणून सादर करता येईल.