वर्क फ्रॉम होम आता न्यू नॉर्मल झाले आहे; 82% कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये परत यायचेच नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आता लोकं ऑफिसला जाण्याऐवजी घरूनच काम करण्याला प्राधान्य देत आहेत. जॉब साइट SCIKEY च्या टेक टॅलेंट आउटलुकच्या रिपोर्ट नुसार, आधी कोरोना महामारीमुळे, कर्मचार्‍यांवर घरातून काम करण्याची सिस्टीम लादण्यात आली होती, मात्र आता 2 वर्षांनंतर ‘वर्क फ्रॉम होम’ आता न्यू नॉर्मल (New Normal) झाले आहे.. या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही आणि घरून काम करायचे आहे.

टॅलेंट टेक आउटलुक 2022 चार खंडांमधील 100 हून जास्त अधिकारी आणि एचआर एक्झिक्युटिव्हकडून मिळालेल्या फीडबॅकचे विश्लेषण करते. सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.अभ्यासात सहभागी असलेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की,”त्यांची प्रोडक्टिविटी जास्त आहे आणि वर्क फ्रॉम होममुळे तणावही कमी असतो.

दरम्यान, 80 टक्क्यांहून अधिक एचआर मॅनेजर्सनी सांगितले की,” त्यांच्यासाठी पूर्णवेळ ऑफिसमध्ये जाणारे कर्मचारी शोधणे अवघड होत आहे. त्याच वेळी, 67 टक्क्यांहून जास्त कंपन्यांनी असेही म्हटले की,” त्यांना ऑफिसमधून काम करणारी लोकं शोधणे कठीण होत आहे.”

एम्प्लॉयरसाठी आव्हान
बदललेल्या वातावरणात, वर्क फ्रॉम होम आता पर्यायाऐवजी न्यू नॉर्मल झाले आहे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी लोकं देखील आपल्या एम्प्लॉयरकडून अशी अपेक्षा करतात. जे एम्प्लॉयर या सिस्टीमचा अवलंब करण्यास तयार नाहीत त्यांना चांगल्या टॅलेंटला गुंतवून ठेवण्यासाठी आणि आधीच कार्यरत असलेल्या लोकांना त्यांच्यासोबत टिकवून ठेवण्यासाठी आव्हानांना सामोरे जावे लागेल.

Leave a Comment