व्यवसायासाठी पैसे हवे असतील तर ‘या’ बँकांकडून मिळेल स्वस्त कर्ज, त्यासाठीचे अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे फंड उभारणे. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि तो चालवण्यासाठी जितकी चांगली कल्पना आवश्यक असते तितकीच पैशांचीही गरज असते. सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर खूपच कमी आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या रिटेल लोनचे व्याजदरही कमी झाले आहेत. तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर कोणत्या बँकेकडून स्वस्त दरात कर्ज मिळेल हे जाणून घेउयात.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI अतिशय कमी व्याजदरात व्यवसायिक कर्ज देत आहे. 50 लाख ते एक कोटीपर्यंतच्या रकमेसाठी बँक मार्चमध्ये 11.2 टक्के दराने व्याज देत आहे. मात्र, बँक त्यावर 2 ते 3 टक्के प्रक्रिया शुल्कही आकारते. असे असूनही, इतर बँकांच्या तुलनेत व्याजदर कमीच राहतील. हे कर्ज बँकेकडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जात आहे.

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेनेही परवडणाऱ्या दरात कर्ज देऊ केले आहे. मार्चमध्ये बँकेकडून 16 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. कर्जावर बँकेकडून 499 रुपये प्रक्रिया शुल्क देखील आकारले जात आहे. HDFC बँक 6 ते 48 महिन्यांसाठी 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे.

खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेली एक्सिस बँक देखील 15 टक्के प्रास्ताविक दराने व्यवसायिक कर्ज देत आहे. बँकेकडून व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे, ज्याचा कालावधी 12 महिने ते 36 महिन्यांपर्यंत असू शकतो. यासाठीचे व्याजदर व्यवसायाच्या प्रकारावर आणि कर्जाच्या रकमेनुसार बदलू शकतात.

ICICI बँक 16 टक्के प्रास्ताविक दराने व्यवसाय कर्ज देखील देत आहे. जर तुमच्याकडे व्यवसायाची चांगली कल्पना असेल तर तुम्ही बँकेकडून 40 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. त्याची परतफेड करण्यासाठी 6 ते 48 महिने लागतील. बँकेने दिलेले व्याज देखील कर्जाच्या रकमेवर आणि व्यवसायाच्या पद्धतीवर अवलंबून असेल.

Leave a Comment