LIC पॉलिसीशी संबंधित माहिती मोबाइलवर हवी असल्यास अशाप्रकारे अपडेट करा तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही भारतीय आयुर्विमा निगम (LIC) ची पॉलिसी देखील खरेदी केली असेल आणि तुम्हाला मोबाइलवर पॉलिसी प्रीमियमची माहिती हवी असेल, तर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्वरित अपडेट करा. LIC आपल्या ग्राहकांना प्रीमियम आणि संबंधित माहिती मोबाइलवर नोटिफिकेशन अलर्टच्या स्वरूपात पाठवते.

LIC कडून ही माहिती मिळवण्यासाठी, ग्राहकाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स LIC मध्ये रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. ग्राहक काही सोप्या स्टेप्सचे पालन करून त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यांच्या मोबाइलवर नोटिफिकेशन अलर्ट मिळवू शकतात. त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.

अशाप्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करा
>> सर्वांत आधी तुम्हाला LIC च्या http://www.licindia.in या वेबसाईटवर जावे लागेल.
>> आता होम पेजच्या सर्वात वर ‘Customer Services’ नावाचे बटण दिसेल, त्यावर जाऊन खाली स्क्रोल करा.
>> त्यानंतर लिस्टमधून ‘अपडेट युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाइन’ वर क्लिक करा.
>> आता तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल. येथे ‘तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करा’ या लिंकवर क्लिक करा.
>> स्क्रीनवर उघडणाऱ्या नवीन पेजमध्ये तुम्हाला तुमची माहिती टाकावी लागेल.
>> कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि डेक्लेरेशन बॉक्स तपासा आणि सबमिट वर क्लिक करा.
>> पॉलिसी नंबर/नंबर्स एंटर करा.
>> आता ‘व्हॅलिडेट पॉलिसी डिटेल्स’ वर क्लिक करा आणि पॉलिसी नंबर/नंबर्स व्हॅलिडेट करा. अशा प्रकारे तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स यशस्वीरित्या अपडेट केले जातील. आता तुम्ही तुमच्या पॉलिसीचे प्रीमियम काही क्लिक्सने ऑनलाइन भरू शकाल.

अशाप्रकारे ऑनलाइन स्टेट्स तपासा
>> LIC पॉलिसीचे ऑनलाइन स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला पहिले अधिकृत वेबसाइट https://www.licindia.in/ वर जावे लागेल. इथे स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
>> रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाकावा लागेल. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्ही तुमचे स्टेट्स कधीही तपासू शकता.
>> तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 022 6827 6827 वर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <पॉलिसी नंबर> लिहून मेसेज पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवल्यास तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

Leave a Comment