हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपण दीर्घायुष्य जगावे. लहान मुलांना किंवा कोणत्याही व्यक्तीला आशीर्वाद देताना आजी-आजोबा देखील दीर्घायुष्यच मागतात. परंतु आज कालच्या बद्दलत्या लाईफस्टाईलमुळे हे दीर्घायुष्य कमी होत चालले आहे. तसेच अनेक आजार उद्भवू लागले आहेत. परिणामी लोकांचे वय लवकर वाढत आहे. मात्र आयुर्वेदिक औषधांमुळे आपल्याला दीर्घायुष्य जगता येऊ शकते. हेच दीर्घायुष्य कसे लावावे आणि त्यासाठी काय करावे याविषयी जाणून घ्या.
आयुर्वेदिक औषध
दीर्घायुष्य हवे असल्यास रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवा.
त्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. तसेच बडशेप आणि मेथीचे दाणे देखील चावून खावा. असे केल्यामुळे बरेच आजार शरीरापासून दूर राहतात. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी होतो. डोके शांत राहते. कोलेस्ट्रॉल आणि हार्ट बर्नपासून बचाव होतो.
पाणी पिण्याचे फायदे
तज्ञ सांगतात की बडीशेप आणि मेथीच्या पाण्यामध्ये 87 तत्व असतात. यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, कॅन्सर, न्यूरोलॉजिकल डिजीज अशा कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. तसेच यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी, अॅंटी-कॅन्सर, अॅंटी-मायक्रोबिअल, अॅंटी वायरल असल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. हे पाणी दररोज पिल्यामुळे भूक कंट्रोलमध्ये राहतो. हे पाणी दररोज पिल्यास आयुष्य वाढू शकते.