नवरात्रोत्सवासाठी पोशाख खरेदी करायचाय? तर मुंबईतील या 5 मार्केटला नक्की भेट द्या

Navratri Celebration
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रात गणेशोत्सव  जितक्या उत्साहात केला जातो. तितक्याच उत्साहात नवरात्रोत्सव देखील साजरी केला जातो. यामुळेच तब्बल 9 दिवस महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते. या नऊ दिवसांत गरबा नृत्य आणि दांडिया रास अशा नृत्यांचे पारंपारिक कार्यक्रम ठेवले जातात. दांडिया नाइट्सचे तर प्रत्येक शहरात आयोजन करण्यात येते. यासाठी मुली मुले विशेष अशी पारंपारिक आभूषणे खरेदी करतात. रंगीबिरंगी घागरे, चनिया चोली, दांडियाच्या काठ्या अशा सर्व गोष्टी या दांडिया नाइट्समध्ये खास आकर्षित ठरतात.

त्यामुळे तुम्ही देखील जर दांडिया नाइट्ससाठी आभूषणे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील या 5 मार्केटला नक्की भेट द्या. याठिकाणी तुम्हाला गरबा नाईटसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सहज आणि स्वस्त दरात मिळून जातील. तुम्हाला जर घागरे घ्यायचे असो दांडिया घ्यायचा असो किंवा दागिने खरेदी करायचे असो अशा सर्व गोष्टी तुम्हाला सहजरित्या या मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जातील. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती 5 मार्केट…

बोरिवली स्ट्रीट मार्केट

बोरिवली स्ट्रीट मार्केट हे सणासुदीच्या खरेदीसाठी सर्वात स्वस्त दरात परवडणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे सणासुदीच्या काळात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सहज मिळून जातात. सध्या नवरात्रोत्सव याठिकाणी सर्वात जास्त गर्दी पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील या मार्केटमध्ये खरेदीसाठी गेला तर तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये घागरे, दागिने आणि नवरात्रीसाठी लागणारी आभूषणे मिळून जातील. याठिकाणी जोडप्यांसाठी नवरात्रीचा विशेष पोशाख देखील मिळून जाईल.

चारकोप मार्केट

मुंबईतील चारकोप मार्केट हे नवरात्रीच्या पोशाखांसाठी उत्तम कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला सणासुदीसाठी लागणारे पोशाख सहज भाड्याने देखील मिळून जातील. तसेच याठिकाणी तुम्हाला हवे तसे घागरे आणि पोशाख मिळून जातील. या मार्केटमधून तुम्हाला खूप कमी दरात आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे विकत घेता येतील.

मालाड स्ट्रीट मार्केट

मालाड स्ट्रीट मार्केट हे बोरिवली स्ट्रीट मार्केटच्या जवळ आहे. बोरिवली मार्केटमध्ये महिलांसाठी सणासुदीचे कपडे जास्त मिळतात. तर मालाड मार्केटमध्ये लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे कलेक्शन उपलब्ध आहेत. लहान मुलांचे कपडे, पादत्राणे आणि लहान मुलींसाठीच्या ज्वेलरी देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या लहान मुलांसाठी कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही मालाड स्ट्रीट मार्केटला नक्की भेट द्या.

मंगलदास मार्केट

मंगलदास मार्केट हे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या अगदी जवळ आहे. या मार्केटमध्ये नवरात्रीच्या उत्सवादरम्यान कपड्यांचे सेल लावले जातात. तसेच इतर वस्तूंवर देखील ऑफर्स दिल्या जातात. या मार्केटमध्ये तुम्हाला सध्या ट्रेण्डमध्ये असणारे सर्व प्रकारचे पोशाख सहज मिळून जातील. ते जर खरेदी करायचे असतील तर मंगलदास मार्केटला देखील नक्की द्या.

भुलेश्वर मार्केट

भुलेश्वर मार्केट दक्षिण मुंबई प्रदेशात आहे. हे मार्केट पारंपारिक पोशाखासाठी आणि नवनवीन डिझाईनच्या कपड्यांसाठी मुंबईत सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे आणि सर्व प्रकारचे कपडे ज्वेलरी सहज मिळून जाईल. या मार्केटमध्ये तुम्हाला कमी दरात नवरात्र उत्सवासाठी जो पोशाख हवा आहे तो देखील मिळून जाईल.