इग्नूने (ignou) दिली विद्यार्थ्यांना असाइनमेंट सबमिट करण्यास मुदतवाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं (ignou) जून २०२० च्या सत्रअखेर परीक्षेसाठी असाइनमेंट सादर करण्याची मुदत वाढविली आहे. आता इग्नूचे विद्यार्थी १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशभरात असलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

जुलै सत्र (वार्षिक अभ्यासक्रम) आणि जानेवारी सत्र (सेमेस्टर आधारित अभ्यासक्रम) मध्ये प्रवेश घेणारे उमेदवार १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात. आता प्रोजेक्ट, डेझर्टेशन आणि जर्नलशी संबंधित असाइनमेंट देखील या मुदतीपर्यंत सादर केल्या जाऊ शकतात. इग्नूने जारी केलेल्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांना प्रादेशिक केंद्रांकडून असाइनमेंटबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. यापूर्वी इग्नूने ३० एप्रिल ते ३१ मे दरम्यान दोन वेळा टीईई जून 2020 च्या परीक्षेची अंतिम मुदत वाढविली होती. इग्नूने जून टर्म एन्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतही ३१ मे पर्यंत वाढविली आहे.

लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ लक्षात घेता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (ignou) त्यांच्या टीईई २०२० जूनच्या परीक्षेच्या अर्जाची तारीख ३१ मे पर्यंत वाढवली. आहे. इग्नू परीक्षा देण्यास इच्छुक उमेदवार इग्नू परीक्षा पोर्टलवर ignou.ac.in वर लॉग इन करू शकतात आणि त्यांची नोंदणी करू शकतात. यापूर्वी १ जून २०२० रोजी होणारी टीईई परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाउनमुळे देशभरात असलेल्या इग्नूच्या सर्व ५६ प्रादेशिक केंद्रांवरील सर्व कामकाज स्थगित करण्यात आले आहे. इग्नू पदवी पदवीधर, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि पदविका स्तरावरील सुमारे २७७ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”