शहरातील बेकायदा नळ लवकरच होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बेकायदा नळांचा विषय गाजत आहे शहरात बेकायदा नळांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पण अजूनही मनपाला हें शोधून बंद करता आलेले नाहीत. परंतु आता नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील अनेक भागातील बेकायदा नळ आपोआप बंद होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेत सुमारे 1 हजार 900 किलोमीटरची पाईपलाईन शहरात टाकली जाणार आहे. त्यात 700 किलो मीटर चे जुने पाईप ही बदलले जाणार आहे. लाईन बदलल्यानंतर मनपाची परवानगी असलेले नळच नव्या लाईन वर घेतले जातील त्यामुळे बेकायदा शाळांचा प्रश्न आपोआप संपेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. यामध्ये 1308 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरु आहे. यामध्ये 18 टाक्या जलशुद्धीकरण केंद्र दोन पाणी साठवण टाक्या अशी कामे सध्या शहरात सुरू आहे. मुख्य पाइपलाइनच्या कामासाठी पाठपुरावा देखील सुरू आहे. दरम्यान ज्या भागात रस्त्यांची कामे सुरू आहे. तिथे अंतर्गत पाईपलाईन देखील टाकली जात आहे या योजनेत सुमारे 2100 किलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिन्या यांचा समावेश आहे.

शहरात लाखोंच्या संख्येत बेकायदा नळ –
शहरातील बेकायदा नळांची संख्या लाखांपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या ताब्यात महापालिकेने पाणीपुरवठा योजना दिली होती. त्यावेळी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात लाखाच्यावर बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते.

Leave a Comment