कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक, रेठरे खुर्द व आटके येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या ठिकाणी राज्य उत्पादन पथकाने छापा टाकला. या छाप्यात तिघांवर कारवाई करण्यात आली असून तीन चारचाकी वाहनांसह 5 लाख 21 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग विभागीय उप-आयुक्त वाय. एम. पवार यांचे मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क, सातारा अधीक्षक अनिल चासकर यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने कारवाई केलेल्या आहेत. कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक, रेठरे खुर्द, व आटके येथे दि. २४/०५/२०२१ रोजी अवैद्य मद्य वाहतूकी करणारे ज्ञानदेव भिमराव देसाई (रा. बेलवडे बु. ता.कराड), प्रकाश वसंत विभुते (रा.वाळवा. जि. सांगली) व विलास मोहन नांगरे (रा. हुबळवाडी, ता.वाळवा. जि.सांगली) या तिघांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईमध्ये चारचाकी तीन वाहनासह देशी दारु एकूण २४५ लीटर, व विदेशी दारु २७ लीटर जप्त करण्यात आले असुन एकुण रु.५, २१,६००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक एस.बी.जंगम, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, जवान व्ही. व्ही. बनसोडे, बी. एस. माळी व महिला कॉ. आर. के. काळोखे यांनी केली.