नवी दिल्ल्ली प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले कि,’ मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बिलकुल नाही, मी संघाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, देशसेवा हेच माझे मिशन आहे.’ नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येण्याची शक्यता असल्याचे राजकीय चर्चा सुरु आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार राहतील. परंतु नितीन गडकरी यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरु आहे तसेच भाजपच्या काही नेत्यांची मागणी देखील आहे.
कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, माझे पंतप्रधान पदाशी काहीही देणेघेणे नाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतोय त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मोदींनाच पंतप्रधानपद मिळेल. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तरी, इतर पक्षाच्या नेत्यांच्या सहमतीने सरकार उभे केले जाईल असे ते म्हणाले.
इतर महत्वाचे –
‘जमात ए इस्लाम’ च्या शाखांवर या कारणामुळे छापे