IMF Pakistan Bailout : पाकिस्तानची पॉवर वाढली!! IMF कडून 1 अब्ज डॉलर्सचे पॅकेज मिळालं

IMF Pakistan Bailout
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आर्थिकदृष्टया कंगाल झालेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज मंजूर (IMF Pakistan Bailout) करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं याबाबत माहिती देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे भारताने विरोध करूनही पाकिस्तानने हे पॅकेज मिळवण्यात यश मिळवलं आहे. भारत- पाकिस्तान युद्धाच्या वातावरणातच मिळालेल्या या पॅकेजमुळे पाकिस्तानची पॉवर वाढली आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था IMF वर अवलंबून IMF Pakistan Bailout

IMF कडून मिळालेली हि मदत पाकिस्तान साठी अतिशय महत्वाची आहे असं निवेदन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत असून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येतंय. तसेच ‘पाकिस्तानसाठी आयएमएफने १ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर करणे हे भारताच्या दबाव धोरणाचे अपयश आहे असा टोलाही त्यांनी भारताला लगावला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था IMF च्या मदतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आयएमएफने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसाठी प्रमाणाच्या बाहेर पैसा दिला आहे. १ अब्ज डॉलर्स (८,५०० कोटी रुपये) एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFA) अंतर्गत तात्काळ दिले जातील, तर १.३ अब्ज डॉलर्स (११,००० कोटी रुपये) कर्ज पुढील २८ महिन्यांत हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. (IMF Pakistan Bailout)

दरम्यान, पाकिस्तानला पॅकेज देण्यास भारताने तीव्र विरोध केला होता. पाकिस्तानला यापूर्वी IMF कडून मिळालेल्या मदतीचा योग्य वापर झाला नाही, उलट या पैशाच्या माध्यमातून लष्कर आणि दहशतवादी गटांना अप्रत्यक्षपणे मदत मिळाली. पाकिस्तान कडून IMF च्या निधीचा वापर भारताच्या भूमीवर हल्ले करणाऱ्या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो. त्यामुळे अशी मदत केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही धोकादायक आहे, असा ठाम आरोप भारताने केला. परंतू, तरीही आयएमएफने पाकिस्तानला पैसा दिला आहे.