Sunday, January 29, 2023

पुण्यात संचारबंदी नाही ; पोलिस प्रशासनाने केले स्पष्ट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे. त्यामुळे पुण्यात संचारबंदी लागू करण्याबाबत चर्चा सुरु होती. सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून २३ तारखेपर्यंत पुणे शहर हद्दीत संचारबंदी लागू करण्यात येईल असं बोललं जात होते. मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना बाधित असणाऱ्या १६ रुग्णांपैकी पुण्यात ७ तर पिंपरी चिंचवडमध्ये ९ रुग्ण आहेत. २७८ जणांच्या कोरोना संशयितांनी चाचण्या केल्या होत्या पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ही आल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कोरोना हा जीवघेणा आजार नसून त्याच्या उपचार केल्यानंतर तो बरा होईल अशा सुचना प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान सुरक्षितेसाठी आजपासून ३ दिवस प्रसिद्ध तुळशीबाग परिसरातील दुकाने बंद राहणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी हा उत्स्फूर्त निर्णय घेतला आहे.