हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. या योजनेचा 13 वा हप्ता लवकरच मोदी सरकार तुमच्या खात्यावर वर्ग करणार आहे.
शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ॲप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाची माहिती मिळवायची असेल आणि तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ॲप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.
…तर मिळणार नाही हप्त्याचे पैसे
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत 12 हप्ते जमा झालेले आहेत. 13 वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी करावयाच्या आहेत. त्या जर नाही केल्या तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता.
महत्वाची आहेत ‘ही’ दोन कामे
(PM Kisan Yojana) या माध्यमातून तुम्हाला 13 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला दोन महत्वाची कामे हि करावीच लागणार आहेत. एक म्हणजे लवकरात लवकर ई-केवायसी आणि दुसरे म्हणजे भू सत्यापन अर्थात भु लेखांची पडताळणी होय. हि जर कामे तुम्ही वेळीच केली नाही तर तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही.
भू-लेखा पडताळणी
जर तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल, तर तुमच्यासाठी जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तुम्ही ते पूर्ण करू शकता.
ई-केवायसी
पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर कोणी ते पूर्ण केले नाही तर त्याला मिळणाऱ्या हप्त्याचा फायदा अडकू शकतो. त्यामुळे, विलंब न करता, लवकरात लवकर ई-केवायसी करा. ई-केवायसी करणे खूप सोपे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन स्वतः ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी करू शकता.
येथे संपर्क करा –
पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Yojana) काही समस्या असल्यास, तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. या योजनेशी संबंधित तुमची प्रत्येक समस्या येथे सोडवली जाईल.