नवी दिल्ली । जर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) पॉलिसीही खरेदी केली असेल आणि तुम्हाला मोबाईलवर पॉलिसी प्रीमियमची माहिती हवी असेल तर ताबडतोब तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करा. LIC आपल्या ग्राहकांना मोबाईलवर सूचना अलर्टच्या स्वरूपात प्रीमियम आणि संबंधित माहिती पाठवते.
LIC कडून ही माहिती मिळवण्यासाठी, ग्राहकाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स LIC कडे रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. ग्राहक काही सोप्या स्टेप्सचे पालन करून त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाइन रजिस्टर करू शकतात आणि त्यांच्या मोबाईलवर सूचना अलर्ट मिळवू शकतात. त्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या.
अशाप्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करा
>> सर्वप्रथम तुम्हाला LIC ची वेबसाइट http://www.licindia.in वर जावे लागेल.
>> आता होम पेजच्या वर ‘कस्टमर सर्विसेज’ नावाचे एक बटण दिसेल, त्यावर खाली स्क्रोल करा.
>> नंतर लिस्टमधून ‘अपडेट योर कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाइन’ वर क्लिक करा.
>> आता तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल. येथे ‘अपडेट योर कॉन्टॅक्ट डिटेल्स’ या लिंकवर क्लिक करा.
>> तुम्हाला तुमची माहिती एका नवीन पेजमध्ये टाकावी लागेल जी स्क्रीनवर उघडेल.
>> आता तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि डेक्लेरेशन बॉक्स तपासा आणि सबमिट वर क्लिक करा.
>> पॉलिसी क्रमांक एंटर करा.
>> आता ‘वेलिडेट पॉलिसी डिटेल्स’ वर क्लिक करा आणि पॉलिसी नंबर/नंबर्स वेलिडेट करा. अशा प्रकारे आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स यशस्वीरित्या अपडेट केले जातील. आता तुम्ही फक्त काही क्लिकवर तुमचे पॉलिसी प्रीमियम ऑनलाईन भरू शकता.
याप्रमाणे ऑनलाइन स्टेट्स तपासा
>> LIC पॉलिसीची ऑनलाइन स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
>> रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाकावा लागेल. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर, आपण आपले स्टेट्स कधीही तपासू शकता.
>> तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 022 6827 6827 वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <policy number> लिहून मेसेज पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.