नवी दिल्ली । जर तुम्हीही पेन्शन घेत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नियमांनुसार, यावर्षी सर्व पेन्शनधारकांना 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावे लागेल. तसे न केल्यास त्यांची पेन्शन थांबेल. लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुमची पेन्शन पुढे चालू राहते.
केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सामान्य मुदत दरवर्षी 30 नोव्हेंबर असते. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांसाठी ही मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2022 करण्यात आली आहे.
आपण कोणत्या मार्गाने लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता ते जाणून घ्या.
पोर्टलवर सबमिट करू शकता
तुम्ही तुमचे लाइफ सर्टिफिकेट https://jeevanpramaan.gov.in/ या लाइफ सर्टिफिकेट पोर्टलवर सबमिट करू शकता. यासाठी तुम्हाला पहिले पोर्टलवरून लाइफ सर्टिफिकेट अॅप डाउनलोड करावे लागेल. याशिवाय, UDAI द्वारे प्रमाणित केलेले फिंगरप्रिंट डिव्हाइस असावे. यानंतर, तुम्ही स्मार्टफोनद्वारे आणि अॅपमध्ये नमूद केलेल्या पद्धतींचा वापर करून घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता.
घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट जमा करा
पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सांगितले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्सचा वापर करून किंवा पोस्ट ऑफिसच्या डोअरस्टेप सर्व्हिस वापरून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात.
‘या’ बँका देत आहेत सर्व्हिस
भारतीय बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया ‘या’ बँका सर्व्हिस देत आहेत.
तुम्ही वेबसाइट http://doorstepbanks.com किंवा http://www.dsb.imfast.co.in/doorstep/login किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अॅप्लिकेशनवर किंवा टोल फ्री क्रमांकावर (18001213721 किंवा 18001037188) कॉल करून बँकेची डोअरस्टेप सर्व्हिस बुक करू शकता.
इंडिया पोस्टने सुरू केली सर्व्हिस
इंडिया पोस्टने ट्विट करून ही माहिती दिली आहे की, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जवळील पोस्ट ऑफिसमधून कॉमन सर्व्हिस सेंटर (CAC) मधून जीवन प्रमाण सेवा सहजपणे घेऊ शकतात. विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारत सरकार पेन्शनर योजनेसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मिळविण्याची समस्या सोडवू इच्छित आहे. जेणेकरून, लाइफ सर्टिफिकेट सहजपणे मिळू शकेल.
कुठे अर्ज करता येईल ?
अर्जासाठी, 7738299899 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवून जवळच्या जीवन सन्मान केंद्रावर अपडेट्स घेता येतील. SMS मध्ये JPL <PIN Code> लिहावे लागेल. यावर तुम्हाला तुमच्या परिसरातील केंद्रांची लिस्ट मिळेल.