PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही कमी पैशाने सुरुवात करू शकता आणि एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF मध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. सरकारने गेल्या काही दिवसांपासून PPF वरील व्याजदर ७.१० टक्के ठेवला आहे. गेल्या काही वर्षात सरकारने आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांबद्दल जाणून घेऊया.

महिन्यातून एकदाच पैसे जमा केले जातील

नव्या नियमानुसार, PPF खात्यात महिन्यातून एकदाच पैसे जमा करता येतात. याशिवाय,
PPF खात्यात 50 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ही रक्कम वर्षात कमीत कमी 500 रुपये किंवा त्याहून अधिक असावी. परंतु PPF खात्यात तुम्ही संपूर्ण आर्थिक वर्षात 1.5 लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकता. यानंतरच तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो.

व्याजदरात मोठी कपात

पीपीएफ खात्यातील शिल्लक रकमेवरही तुम्ही कर्ज घेऊ शकता. गेल्या काही दिवसांत हा व्याजदर 2 टक्क्यांवरून 1 टक्के करण्यात आला आहे. कर्जाची मूळ रक्कम भरल्यानंतर, तुम्हाला दोनपेक्षा जास्त हप्त्यांमध्ये व्याज भरावे लागेल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्याज मोजले जाते.

15 वर्षांनंतरही खाते सक्रिय राहणार

15 वर्षे गुंतवणूक केल्यानंतरही, जर तुम्हाला गुंतवणुकीत रस नसेल, तर तुम्ही तुमचे PPF खाते गुंतवणुकीशिवाय सुरू ठेवू शकता. 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खात्यात पैसे जमा करणे आवश्यक नाही. तुम्ही पीपीएफ खाते मॅच्युरिटीनंतर वाढवण्याचा पर्याय निवडून आर्थिक वर्षातून एकदाच पैसे काढू शकता.

खाते उघडण्यासाठी हा फॉर्म भरावा लागेल

पीपीएफ खाते उघडण्यासाठी फॉर्म ए ऐवजी फॉर्म-१ सबमिट करावा लागेल. PPF खात्याच्या मुदतीच्या 15 वर्षांनंतर (ठेवांसह) मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी, एखाद्याला फॉर्म H ऐवजी फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागेल.

Leave a Comment