SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! Maintenance मुळे काही सेवा 2 दिवसांसाठी बंद ठेवल्या जातील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) काही ग्राहकांना पुढील दोन दिवस विशेष सेवा वापरण्यात अडचणी येतील. वास्तविक, देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या काही सेवा पुन्हा देखभाल अंतर्गत (Under Maintenance) आहेत. तथापि, सर्व ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार नाही असे बँक म्हणाली. या वेळी केवळ एनआरआय सेवा (NRI Services) प्रभावित होतील. SBI ने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, में​टिनेंस एक्टिविटीमुळे बँकेच्या मिस्ड कॉल आणि एसएमएस (SMS) मार्फत एनआरआय सेवा 15 ते 17 डिसेंबर 2020 दरम्यान काम करणार नाहीत.

बँकेने ग्राहकांना त्यांचे इतर डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यास सांगितले
ट्विटद्वारे ग्राहकांना होणाऱ्या अडचणींबद्दल एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच ग्राहकांना बँकेचे अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यास सांगितले आहे. एसबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहकांना अविरत बँकिंगचा अनुभव देण्यासाठी तसेच काही सेवा सुधारण्यासाठी मेंटेनन्स करण्याचे काम केले जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात योनो एसबीआय (YONO SBI) ची सेवा थांबविली गेली. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. याबाबत बँकेच्या ट्विटर हँडलवर ग्राहकांकडून सतत तक्रारी येत असत. यंत्रणेच्या अडचणीमुळे मोबाइल ऍपवर परिणाम झाल्याचे बँकेने म्हटले होते.

https://t.co/GCq2u9k9s8?amp=1

एसबीआयने 22 नोव्हेंबरला इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेड केला
एसबीआयने यापूर्वी 22 नोव्हेंबरला आपले इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेड केले होते. यामुळे, बँकेने यापूर्वीच ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट वापरण्यात येणाऱ्या काही अडचणींबद्दल माहिती दिली होती. 11 आणि 13 ऑक्टोबर 2020 रोजी योनो ऍपच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे बँकेने आपल्या खातेदारांना सांगितले होते. म्हणून, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत ग्राहकांना योनो ऍपद्वारे कोणतीही बँकिंगची सेवा वापरता येणार नाही. योनो एसबीआय भारतीय स्टेट बँकेचे इंटीग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून एसबीआयच्या सर्व बँकिंग सेवा वापरता येतील.

https://t.co/ATMEb79amO?amp=1

https://t.co/aRrvVPSS7P?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment