Tuesday, January 31, 2023

देशातील कामगारांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारकडून किमान वेतन निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना

- Advertisement -

नवी दिल्ली । राष्ट्रीय पातळीवर किमान वेतन निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने प्राध्यापक अजित मिश्रा यांच्या नेतृत्वात तज्ञांचा एक गट स्थापन केला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने यासाठी एक आदेश जारी केला असून राष्ट्रीय पातळीवर किमान वेतन निश्चित करण्यासाठी आणि किमान मजुरी निश्चित करण्याबाबत तांत्रिक माहिती आणि शिफारसी देण्यासाठी तज्ञांचा एक गट स्थापन केला गेला आहे, असे कामगार मंत्रालयाने या निवेदनात म्हटले आहे.

कामगारांच्या विविध श्रेणीसाठी किमान वेतन वेगवेगळे आहे. राष्ट्रीय स्तरावर किमान वेतन म्हणजे एक असे वेतन आहे ​​जे देशभरातील सर्व प्रकारच्या कामगारांना लागू असेल. सूचनेच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

तज्ञांच्या या गटाचे अध्यक्ष अजित मिश्रा हे अध्यक्ष वेतनाचे दर निश्चित करण्याच्या आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती पाहतील आणि वेतन निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक मानदंड विकसित करतील. तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष प्राध्यापक अजित मिश्रा, संचालक, आर्थिक विकास संस्था असतील.

या तज्ज्ञांचा समितीत समावेश आहे
तज्ज्ञ गटाच्या सदस्यांमध्ये प्राध्यापक तारिका चक्रवर्ती (IIM Kolkata), अनुश्री सिन्हा (सीनियर फेलो, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकोनॉमिक रिसर्च), विभा भल्ला (सहसचिव) एच श्रीनिवास (महासंचालक, व्हीव्ही गिरी राष्ट्रीय कामगार संस्था) यांचा समावेश आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे वरिष्ठ कामगार आणि रोजगार सल्लागार DPS नेगी हे सदस्य सचिव आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group