हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Aadhar Card हे आपली ओळख पटवण्याचे सर्वात महत्त्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे. त्यामुळे, वेळोवेळी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या डेटाबेसमधून आधारचे व्हेरिफिकेशन करणेही गरजेचे झाले आहे. याद्वारे ते ऍक्टिव्ह आहे की नाही याची खात्री कळते. UIDAI च्या डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीशी आपले आधार डिटेल्स जुळतात की नाही हे देखील तपासले पाहिजे. हे लक्षात घ्या कि, आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक्स प्रमाणीकृत माहिती आणि इतर वैयक्तिक तपशीलांची नोंद केली जाते.
UIDAI असेही म्हणतात की,” अधिकारी आणि नागरिकांनी आधार नंबर हे ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्याचे व्हेरिफिकेशन करणे जरुरीचे आहे. प्रत्येक 12 अंकी क्रमांक हा आधार नंबर असू शकत नाही. त्यामुळे, वेळोवेळी UIDAI डेटाबेसमधून आधारचे व्हेरिफिकेशन करत राहावे. तसेच आपल्याशी संबंधित जर एखादी माहितीची चुकीची नोंद झाली असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी.” Aadhar Card
आपल्या Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे खूप सोपे आहे. हे काम स्मार्टफोनद्वारे घर बसल्या अगदी सहजपणे करता येते. आधारचे व्हेरिफिकेशन कसे करायचे ते जाणून घ्या –
सर्वांत आधी UIDAI ची वेबसाइट http://www.uidai.gov.in वर जा.
वेबसाइटवर ‘आधार सर्व्हिसेस’ अंतर्गत ‘आधार (AADHAAR) नंबर व्हेरिफाय करा’ वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल.
नवीन पेजवर 12 अंकी आधार (AADHAAR) नंबर आणि कॅप्चा एंटर करा.
आधार क्रमांक खरा असेल तर वेबसाइटवर ‘Aadhaar Verification Complete’ असा मेसेज दिसेल. यानंतर आपले वय, राज्याचे नाव आणि तुमच्यामोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक इ. तपशील देखील दिसून येतील.
अनेक प्रयत्नांनंतरही आधार नंबरचे व्हेरिफिकेशन झाले नाही तर वेबसाइटवर आधार नंबर उपस्थित नसल्याचे दाखवेल. Aadhar Card
व्हेरिफिकेशन नसेल तर ‘हे’ काम करा
जर आधारचे व्हेरिफिकेशन झालेले नसेल तर आपल्याला आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरला भेट द्यावी लागेल. जिथे बायोमेट्रिक्स पुन्हा व्हेरिफाय केले जातील आणि UIDAI च्या डेटाबेसमध्ये जोडले जातील. यासाठी, फी म्हणून 25 रुपये +18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. त्यानंतर आधार अपडेट केले जाईल. Aadhar Card
हे पण वाचा :
Share Market मध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे समजून घ्या
Investment : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या
Gold Price Today : आज सोन्या-चांदीच्या भावात वाढ, नवीन दर पहा
Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!