रॅलीतील गोळीबारानंतर इम्रान खान यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Imran Khan 01
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी सरकारच्या विरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा ‘लॉंग मार्च’चे आयोजन केले होते. गुजरानवाला या ठिकाणच्या रॅली सुरु असताना अचानक हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यासह काहींवर गोळीबार केला. AK-47 रायफलने केलेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागली. या घटनेबाबत इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून ‘देवानं मला नवा जन्म दिला आहे. आता मी पुन्हा ताकदीनं लढणार आहे,” असे खान यांनी म्हंटले.

अचानकपणे झालेल्या गोळीबारानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आले. खान यांच्यासोबत असणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे.

इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर आता पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे सरकार आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेविरोधात इम्रान खान यांनी मोर्चा काढलयानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना हा एक प्रकारचा इशारा असल्याचे बोलले जात आहे.