14 एप्रिल मद्यपान बंदी दिवस म्हणून घोषित करा : इमरान मुल्ला

Imran Mulla
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. त्यामुळे हा दिवस मद्यपान बंदी दिवस घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी दिली.

मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी सर्वजण एकत्र येतील आणि डॉ. आंबेडकर यांची जयंती देश, जगभरात साजरी करतील. हा दिवस मध्यपान बंदी दिवस म्हणून शासनाकडून जाहीर करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून महामानवाचे विचार शासनाने म्हणून मद्यपान विक्री बंद ठेवावी. त्यामुळे सामाजिक एकोपा राखला जाईल. तसेच मद्यपान न करता लोक महामानवाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतील.

आपण निवेदनाद्वारे केलेल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. आणि 14 एप्रिल रोजी मद्यपान बंदी दिवस घोषित करावा. अन्यथा संघटनेकडून शासनाविरोधात जनआंदोलन उभारावे लागेल.

निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन भिसे सामाजिक कार्यकर्ते राकेश पवार तोफिक बागवान ओमकार कांबळे अनिकेत तडाके संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण कराड शहर अध्यक्ष विकी शहा हे उपस्थित होते.